श्री.अनघा-दत्त देवस्थान
दीर्घायु फार्म्स

आमच्याबद्दल

श्री.गणेशाय नम:

श्री.सरस्वती दैव्ये नम:

श्री.गुरुभ्यो नम:

श्री. दत्त महाराजांच्या कृपेने व श्री. अनघालक्ष्मी मातेच्या आशीर्वादाने आम्ही या अखंड पृथ्वीतलावर प्रथमच श्री. अनघा-दत्त दाम्पत्य यांचे अष्ट सिद्धी प्राप्त अष्ट मानसपुत्र निमी, ह्रीमान, कीर्तीमान, जितात्मा, मुनिविर्यक, दिप्तीरोम, अंशुमन आणि शैलाभ यांची प्राणप्रतिष्ठा आणि अचल स्थापना करण्याची स्वप्नपूर्ती व या बरोबरच श्री. दत्त महाराजांचे प्रथम अवतार श्री. श्रीपादश्रीवल्लभ स्वामी आणि द्वितीय अवतार श्री. नृसिंहसरस्वती स्वामी यांची पण प्राणप्रतिष्ठा आणि श्री.अनघा-दत्त यांचे अचल पादुकांची स्थापना करण्याच्या स्वप्नपूर्तीचा अभूतपूर्व सोहळा शुक्रवार, मार्गशीर्ष २, शके १९४४, सौर तारीख शुक्रवार, २५ नोव्हेंबर २०२२ पासून मार्गशीर्ष ७, शके १९४४, सौर तारीख ३० नोव्हेंबर २०२२ कालावधीत शास्त्र-शुद्ध रित्या संपन्न करण्यात आला.

श्री. दत्त म्हणजे अघा पापांचा नाश करणारे पंचाश्रमी आहेत. अत्रिपुत्र दत्त हे अनघा-दत्त आहेत व त्यांची अर्धांगिनी अनघालक्ष्मी स्वरूपाने आहेत.

भावीश्योतर पुराण, ब्रम्हांड पुराण, हरिवंश पुराण, दत्त पुराण इ. ग्रंथात याचा उल्लेख आढळतो. या सर्व अष्ट पुत्रांना अष्ट सिद्धी अणिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्व आणि वशित्व प्राप्त आहेत.

दत्तनाम महायोगी विष्णोरंशी महीतले !

द्वितियSनघो नाम लोकेSस्मिन परिश्रुत: !!

तस्य भार्याSनघा नाम बभूव सहचारिणी !

अष्टपुत्राSतीव वत्सा सवैब्राम्ह गुनैयुर्ता !!

अनघो विष्णुरूपेण लक्ष्मीश्र्चैषाSनघा स्मृता !!

अर्थातच श्रीदत्तमूर्ती ही त्रिगुणात्मक त्रैमूर्ती आहे. ब्रम्हा, विष्णू, महेश या शक्ती एकत्रीत आहेत. तसेच महासरस्वती, महालक्ष्मी व महाकाली यांचे अनघालक्ष्मी हे एकत्रीत स्वरूप आहे. ती एक दिव्यशक्ती आहे आणि अनघदेवाने वामभागी धारण केले आहे.

ही अनघालक्ष्मीच पद्मावती आहे, राजराजेश्वरी आहे, ती दशमहाविद्यास्वरूपिणी आहे.

अनघालक्ष्मी ही संपूर्ण परिपूर्णता स्थिती आहे.

अनघा-दत्त व्रत हे प्रभावी पणे मार्गशीर्ष कृष्णाष्टमीच्या दिवशी अनघाष्टमी गृहीत धरून करणे योग्य, किंवा प्रत्येक महिन्याच्या कृष्णाष्टमीच्या दिवशी जरी अनघाष्टमी व्रत केले तरी त्या पासून मिळणारे अनंत आशीर्वाद आणि पूण्यफळ हे असीमित आहेत.

श्री. दत्त आणि आणि श्री. अनघालक्ष्मी यांची अखंड कृपादृष्टी आपल्या सर्वांवर सदैव राहावो ही प्रार्थना.

! दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा !

! श्री. अनघा दैव्ये नमा: !

! श्री. अनघालक्ष्मी दत्तात्रेयाय नम:

Scroll to Top