श्री.अनघा-दत्त देवस्थान
दीर्घायु फार्म्स

श्री. अनघा – दत्त पादुका

आपल्या मनातील संकल्प ज्या वेळेस या ठिकाणी सांगतो त्या वेळी श्री. अनघा – दत्त प्रभु आपले काम या पादुकांच्या माध्यमातून करतात.

श्री. अनघा – दत्त देवस्थानातील या पवित्र ‘ अचल ’ पादुकांचे “ चंदन लेपन ” प्रत्येक पौर्णिमेला आणि प्रत्येक गुरुवारी केले जाते. त्यानंतर चंदनाचे छोटे गोळे करून दत्त भक्तांना प्रासादिक स्वरुपात दिले जातात.

श्री. अनघा – दत्त देवस्थानातील मुख्य गाभार्यातील ‘ चल ’ पादुका या शिसम या लाकडा पासून तयार करण्यात आलेल्या आहेत आणि त्या पादुकांचे लेपन सुवासिक अत्तराने दररोज करण्यात येते. या पादुकांवर श्री. दत्त महाराजांची छोटी मूर्ती विराजमान आहे.

Scroll to Top