श्री.अनघा-दत्त देवस्थान
दीर्घायु फार्म्स

श्री. अनघाष्टमी व्रत

श्रीपादप्रभूंनी स्वत:च सांगितले आहे की, सरस्वती ही सृष्टीतील आद्यदेवता आहे. या ज्ञानदेवतेला प्रेरणा देणारी महासरस्वती आहे. म्हणून सरस्वती व महासरस्वती ह्या दोघी वेगळ्या आहेत. महासरस्वती हे अनघास्वरूपच आहे. सृष्टीचे स्थितीकरण, समृद्धीकरण हे लक्ष्मीमातेचे स्वरूप आहे. लक्ष्मीच्या या कार्याला प्रेरणा देणारी महालक्ष्मी हेही अनघास्वरूपच आहे. तसेच शक्ती हे स्वरूप असणारी काली देवता आहे व तिला प्रेरणा देणारी महाकाली ही कालस्वरूपाची प्रेरणा असणारे अनघास्वरूप आहे.

ही अनघालक्ष्मीच पद्मावती आहे, राजराजेश्वरी आहे. तसेच ती दशमहाविद्यास्वरूपिणीही आहे. सर्व अध्यात्मसाधनांचे अंतिम साध्य असणारी अध्यात्मविद्या-प्राप्ती हे तिचे प्रधान लक्ष्य आहे. दृश्य जगताच्या सृष्टीच्या मूलकारणाचा शोध घेणे हे या अनघालक्ष्मीच्या कृपेचे फलित आहे.

अनघालक्ष्मी ही संपूर्ण परिपूर्णता स्थिती आहे. राजराजेश्र्वरी विवेकाची स्वामिनी, महाकाली बलाची स्वामिनी, महालक्ष्मी सौंदर्य व समृद्धीची स्वामिनी, म्हणजेच विवेक, बल, सौंदर्य, समृद्धी व प्रत्येक कर्मातील कौशल्य (योग: कर्मसु: कौशलम्) या सर्वांच्या तादात्म्याने येणारी परिपूर्णता जीवनात असेल तरच अनघालक्ष्मीची कृपा होईल हे स्पष्ट आहे. 

परमकरुणामय दत्त भगवानांनी वारंवार वेगवेगळे अवतार घेऊन दीन जनांचा उद्धार केला आहे. श्री दत्तगुरुंचे तत्व कल्पनातीत आहे अवधूत स्वामींच्या रुपामध्ये प्रसिद्ध झालेल्या या लिलामूर्तींचे एक गृहस्थ रुप पण आहे. स्वामी गृहस्थ रुपांत मात्र अनघस्वामी किंवा अनघास्वामी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या पत्नीचे नांव अनघा देवी आहे जी साक्षात लक्ष्मीचा अवतार आहे. हे दांपत्य नित्य तपोमय जीवनाने भक्तांना ऐहिक सुख, तत्वज्ञानद्वारा अनुग्रहित करीत असतात. अनघ दंपतिची उपासना पद्धती, कृतयुगात साक्षात दत्त सद्गुरुंनी आपला प्रिय भक्त कार्तर्वीर्यार्जुनाला स्वतः सांगितली.ह्याचे विवरण व्यास लिखीत दत्तपुराणामध्ये आहे. त्रेतायुगात प्रभू श्रीराम व दशरथ महाराज यांनी केले. या व्रतासाठी अतिमुख्य दिवस हा मार्गशीर्ष कृष्ण अष्टमी हा आहे. पण कोणत्याही महिन्याच्या कृष्ण अष्टमीला केले तरी चालते. अघ म्हणजे पाप, अनघ म्हणजे पापहीन. मन, वाचा, कर्म द्वारे आपण प्रत्येक क्षणी अनेक पापे करतो. या पापांमध्ये झालेली वाढ आपल्यासमोर विविध अडचणींच्या रुपात येते. अशा पापांना दूर करणारे, जगाचे जनक जननी अनघ दंपति होय.

मार्गशीर्ष व माघ कृष्ण अष्टमीस, तसेच प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षाची (प्रतिपदेनंतर पौर्णिमेपर्यंत) आणि कृष्ण पक्षाची (पौर्णिमेनंतर अमावास्येपर्यंत).  अष्टमीस “अनघाष्टमी” मानुन सकाळी हे व्रतकरावे, शक्य नसल्यास सायंकाळी स्नान करुन करावे. 

ही अष्टमी ‘अघ म्हणजे पाप’ नाहीसे करते, त्यामुळे हे व्रत करणार्याचे पापनिरसन व दारिद्र्य नाश होऊन त्याला दैवीसंपत्ती, अष्टैश्र्वर्य लाभ व सर्व सुखप्राप्ती होते. सर्व पुण्य, कर्मफळांची प्राप्ती होते. मनोकामनापूर्ती व निर्मलकीर्ती लाभ होतो. सर्व रोगनिरासन होऊन, सातजन्म आरोग्यलाभ होतो, कुमारिकांना सद्दगुणी वरप्राप्ती व सर्वत्र निर्मल यशलाभ होतो. स्त्रीयांना सौभाग्यलाभ होऊन त्यांची कुटूंबसंतती वाढते, तसेच गृहकलहनिवृत्ती होऊन सुखशांती लाभते. सर्वत्र कल्याण होऊन, श्रीअनघामाता व श्रीदत्तात्रेयांचा अनुग्रह होऊन, अंती मोक्षलाभ होतो. 

अनघाष्टमी व्रत हा सलग पाच अष्टमी केल्यास, त्यातून मिळणारे लाभ अगणित आहेत.

आम्ही श्री. अनघा दत्त देवस्थानच्या सान्निध्यात असलेल्या आमच्या खास अशा

यज्ञ मंडप परिसरात याचे आयोजन प्रत्येक महिन्याच्या कृष्ण अष्टमीस करतो. या व्रतासाठी लागणाऱ्या सर्व साधनसामुग्रीची व्यवस्था आम्हीच करतो. यजमान यांना पूर्णपणे शुर्चीभूत होऊन या व्रतास बसायचे आहे.

या साठी आपल्याला आम्हाला किमान दिवस अगोदर सांगावे लागेल. शिवाय जे यजमान दूरच्या अंतरावरून येणार असतील तर त्यांचे साठी आमच्याच दीर्घायु फार्म्स ‌‍‍‌‍‌ अॅग्री रिसोर्ट प्रा. लि मध्ये राहण्याची आणि सात्विक भोजनाची (योग्य मोबदल्यात) उत्कृष्ट व्यवस्था करण्यात येईल.

श्री. अनघाष्टमी व्रत बंधन साठी खर्च प्रत्येकी : रु.२,४५० ( एक अष्टमी साठी )

यात समाविष्ट:

१. व्रत बंधन पूर्वी नाश्ता

२. व्रत बंधन पूजा विधी ( सर्व साधन सामुग्री समाविष्ट )

३. व्रत बंधन विधी नंतर श्री. अनघा दत्त, दीर्घायु देवस्थानात महाआरती

४. सात्विक जेवण आणि सांगता.

माहिती आणि बुकिंग साठी कृपया ९८६७३७४०४० / ७९७७८११५७९ वर संपर्क करा

Scroll to Top